कॉलेज जीवनापर्यंत कधीही वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध आला नाही. माझ्या गावामध्ये आजही रोजचे वर्तमानपत्र येत नाही हि वस्तुस्थिती आहे. यामुळे माझी मुलाखत कधी वर्तमानपत्रामध्ये येईल हे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. मात्र कुटुंबाच्या विश्वासाने आणि समाजाच्या साथीने मी माझे शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला गाव, नंतर जिल्हा तर सध्या देश सोडल्यामुळे माझ्या शिक्षणाबरोबर अनेक अनुभव मला मिळाले. या अनुभवाचा फायदा व आत्मविश्वास बाकी विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून सकाळने केलेले हे प्रयत्न.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा